एसटीच्या मालवाहतूक भाड्यात आता वाढ

रत्नागिरी: पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रुपयांची दरवाढ केली आहे. प्रतिकिलोमीटर दर ४६ रुपये झाला आहे. लॉकडाउनमुळे एसटीतून प्रवासीसेवा बंद होती. यामुळे मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाने परवानगी दिली. यासाठी एसटीने जुन्या बस मालवाहतुकीसाठी तयार करून घेतल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर रत्नागिरी विभागाला मालवाहतुकीतून एक कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सेवा सुरू करण्यात आली, तेव्हा १०० किलोमीटरसाठी ३८ रूपये प्रति किलोमीटर दर होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होत राहिल्याने, महामंडळाने १०० किलोमीटरसाठी ४२ रूपये दर केला. त्यानंतरही अनेक व्यापाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. आता तो ४२ वरून ४६ रुपये करण्यात आला आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*