रत्नागिरी : पणदेरी धरण परिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करा, धरणाच्या खचलेल्या भागाचे मजबूतीकरण युध्दपातळीवर करावे अशा सूचना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शासनस्तरावरून जी मदत लागेल ती तातडीने करू असे आश्वासन ॲड.परब यांनी दिले आहे. मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला व याबद्दल माहिती घेतली. धरण परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी ॲड. अनिल परब यांनी दिल्या.