रत्नागिरी – राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे ९ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.२४ वाजता वंदे भारत एक्सप्रेसने खेड रेल्वे स्थानक येथे आगमन व निवासस्थान जामगेकडे प्रयाण. सकाळी ८.४५ वाजता निवासस्थान जामगे येथे आगमन.
सकाळी ९ ते दुपारी २ वाजता अखिल क्षत्रिय मराठा कदम परिवार आयोजित ७ वे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन कदम राजवंशवाचा ध्वजारोहण सोहळा समारंभास उपस्थिती. (स्थळ जामगे, ता.खेड).
दुपारी २.३० वाजता श्री विश्वकर्मा जयंती उत्सवा निमित्त भेट. (स्थळ- तुळशी खु. सुतारवाडी ता. खेड). दुपारी ३.१५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय सुकिवली येथे भेट. (स्थळ – सुकिवली ता. खेड)
दुपारी ३.३० वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती (मोफत सेवा शिबीर) (स्थळ – वेरळ, खोपीफाटा ता. खेड).
दुपारी ४.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय आवाशी येथे भेट. (स्थळ – आवाशी ता. खेड). सायंकाळी ५ वाजता आवाशी ता. खेड, येथून पोफळवणे सुतारवाडी ता. दापोलीकडे प्रयाण.
सायंकाळी ५.३० वाजता पोफ़ळवणे सुतारवाडी ता. दापोली येथे आगमन व श्री विश्वकर्मा नवतरुण मित्रमंडळ, महिला मंडळ विश्वकर्मा जयंती निमित्त श्री सत्यनारायण पूजेस उपस्थिती व सत्कार सोहळा. (स्थळ- पोफळवणे, सुतारवाडी, ता. दापोली).
सायंकाळी ६.३० वाजता डॉ. केदार वैद्य यांचे सुपुत्र कु. अद्वैत याचा व्रतबंध कार्यक्रमास भेट. (स्थळ – मु. उसगाव ब्राम्हणवाडी, पो. दाभोळ, ता. दापोली.)
रात्रौ ८ वाजता आदम टेटवलकर यांचा मुलगा असीम यांचा विवाह सोहळा समारंभास उपस्थिती. (स्थळ – टेटवली मोहल्ला. ता. दापोली). सोयीनुसार टेटवली मोहल्ला ता. दापोली येथून निवासस्थान जामगे ता. खेडकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता निवासस्थान जामगे ता. खेड येथून मोटारीने (वाहन क्र. एम. एच ४७ बी.एल. ९०००) उपजिल्हा रुग्णालय दापोलीकडे प्रयाण.
सकाळी १०.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आगमन व दिव्यांग तपासणी शिबीरास उपस्थिती. सकाळी ११.१५ वाजता तहसिलदार कार्यालय, दापोली आगमन.
सकाळी ११.३० वाजता राज्य नियोजन बैठक. (दुरदृश्य प्रणालीद्वारे) (स्थळ – तहसिलदार कार्यालय, दापोली.).
दुपारी १२.३० वाजता ता. दापोली मधील विविध विकास कामांची उदघाटने व भूमिपुजन. (स्थळ – चंडिकानगर गोमराई ता. दापोली).
दुपारी १.३० वाजता ग्रामदेवता मंदिर येथे दर्शन. (स्थळ – आसुद ता. दापोली).
दुपारी ०२.३० वाजता दुर्गा देवीमाता मंदिर येथे दर्शन. (स्थळ – मुरुड. ता. दापोली). दुपारी ४ वाजता श्रीमहालक्ष्मी मंदिर येथे दर्शन (स्थळ – केळशी. ता. दापोली).
दुपारी ४.२० वाजता याकुब बाबा दर्गा केळशी येथे भेट. (स्थळ – केळशी ता. दापोली). सोयीनुसार केळशी ता. दापोली, येथून मुंबईकडे प्रयाण व मुक्काम.