मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम काही ठिकाणी रखडले आहे. आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन भागांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रस्त्याबाबत समस्या त्यांच्याकडे मांडल्या.
रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ना. गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.
