राज्यातील ४२ लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून रिक्तपदांची माहिती संकलित केली जात आहे. आगामी काळात लवकरच त्यासंदर्भात मोठा निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.