दापोली : आपल्या सेवाकार्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार 2023’ दापोलीतील सामाजिक कार्यकर्त्या रेखा रविंद्र बागुल यांना जाहिर झाला आहे. दापोलीमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आनंद फाउंडेशन संचलित बहुकविकलांग गतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र दापोलीच्या कार्याध्यक्षा, स्नेहदीप कर्णबधीर विद्यालयाच्या संचालिका, दातार वृद्धाश्रमाच्या संचालिका तसेच अनेक आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कार्यरत असलेल्या रेखा बागुल यांचं कार्य प्रचंड मोठं आहे. त्यांच्या कार्याची महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या संस्थेनं दखल घेतली ही गोष्ट दापोलीकरांसाठी अभिमानाची आहे.

हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वा. यशवंतराव चव्हाण मुंबई सेंटरच्या मुख्य सभागृहात सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

रेखा बागूल यांच्या सर्वांगीण कार्याची दखल यशवंतराव चव्हाण सेंटरने घेऊन त्यांची यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक पुरस्कारासाठी निवड जाहीर केल्याने कोकणच्या वैभवामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Advt.