ओम साईराम मित्रमंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न; डॉ. पवन सावंत यांचे विशेष योगदान

दापोली : शहरातील ओम साईराम मित्रमंडळ दापोली ( दापोलीचा राजा ) या मंडळातर्फे आज दिनांक १७ /०२/ २०२१ रोजी एस टी कर्मचाऱ्यांकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

या शिबीरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ . पवन सावंत आणि कर्मचारी यांनी याकरीता विशेष योगदान दिले आहे. दापोली आगारातील एस.टी.चे अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी नेत्रतपासणी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली शाखेच्या सौ. दरिपकर, पवार आणि सुशांत सावंत, दापोलीचा राजा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच मुनाफ राजापकर यांचे विशेष सहकार्य या करीता लाभले. या शिबिराला अधिकारी व कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*