दापोली: वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूल व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकणारा सिद्धेश गोलांबडे याची महाराष्ट्र राज्यस्तरीय 17 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशस्वी निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत सिद्धेशने उत्कृष्ट कामगिरी करत एका सामन्यात सामनावीराचा किताब पटकावला.
त्याने अवघ्या 10 चेंडूत 30 धावा आणि 3 बळी घेत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या या निवडीबद्दल कॉलेजचे प्राचार्य अरुण सिदनाईक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.