दापोली : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन, चर्चगेट, मुंबई येथे 9 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित वक्तृत्व-गट अ (मराठी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील टी.वाय.बी.कॉम.च्या विद्यार्थिनी श्रुती चंद्रशेखर साखळकर हिने सुवर्णपदक पटकावलं.
या स्पर्धेचा झोनल राऊंड 25 ऑगस्ट रोजी खेड येथे पार पडला होता, ज्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या 12 झोनमधून 44 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.
अंतिम फेरीसाठी ‘भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये व विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये तरुणाईची भूमिका’ हा विषय होता. श्रुतीने या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.
तिला या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे आणि साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रा. स्वाती देपोलकर आणि प्रा. जान्हवी दिवेकर यांनी संघ समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी श्रुतीचे अभिनंदन केले.