पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्य संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पुणे शहरातील दुकाने दुपारी ४ ला बंद होतात. परंतु हातगाडीवाले, पथारीवाले ४नंतर देखील सर्रास सुरु असतात. ते संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहातात. याठिकाणी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांना आणि प्रशासनाला शहर दुपारी ४ वाजता बंद झालेच पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.