पोलिसांनी केली अटक, कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

खेड (रत्नागिरी) :  लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” या संस्थेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम (दोघे रा. चिपळूण) यांच्यावर खेड पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत कलम १२, १७ तसेच BNS कलम ७४, ३५१(३), ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

गेल्या वर्षी गरीब मुला-मुलींसाठी शालेय आणि आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या गुरुकुलात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना अटक केली.

खेडच्या विशेष POCSO कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पीडितेची बाजू सरकारी वकील आणि खाजगी वकील स्वप्निल खोपकर यांनी मांडली. 

पोलिस सखोल तपास करत असून, पीडितेला कायदेशीर संरक्षण आणि समुपदेशन दिले जात आहे.

स्थानिकांनी गुरुकुलाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली असून, अशा संस्थांवर कठोर नियंत्रणाची गरज व्यक्त केली आहे.