रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काय होणार? याची उत्सुकता काल संध्याकाळपासूनच सर्वांच्या मनामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये आघाडी होणार का? हा प्रश्नाची सध्या नाक्या नाक्यावर चर्चा आहे.
‘माय कोकण’ला मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कोणत्याही क्षणाला जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते याची एकत्रितपणे घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दापोलीमध्ये सध्या वेगळंच राजकीय वातावरण निर्माण झालं आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व पक्ष आपापल्यापरीने तयारीमध्ये गुंतले होते.
अशा वेळेला नवीन माहिती समोर आली की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. हा अनेकांसाठी धक्का होता.
दापोलीतील राजकीय समीकरणच या घटनेमुळे बदलू शकतं. शिवसेना राष्ट्रवादी हे जर एकत्र आले तर जागा वाटप कशा प्रकारे होईल ही चर्चा सध्या जोमात आहे. यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुरडा होऊ शकेल.
आता सर्वांना उत्सुकता आहे आघाडी जाहीर होण्याची.