दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता सातवीतील विद्यार्थी श्रेयस मुळे याच्या अध्यक्षतेखाली चंद्रनगर शाळेत शिवजयंती कार्यक्रम साजरा झाला.
शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके यांनी शिवचरित्राबाबत सविस्तर विवेचन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंती कार्यक्रमानिमित्त भाषण, कवितावाचन, पोवाडे, शिवगर्जना, लाठीकाठी यांसारखे कार्यक्रम सादर केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे सामूहिक वाचन केले.
शिवजयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही मुलूख, सांची मिसाळ, नीरजा वेदक या विद्यार्थ्यांनी केले तर सौम्या बैकर हिने सर्वांचे आभार मानले.