दापोली:-जिल्हयातील दापोली नगरपंचायत निवडणूकीमध्ये अपक्षांनी बंडखोरी कायम ठेवत राजकीय पक्षांसमोर मोठे आवाहन उभे केले आहे. १३ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. आज केवळ चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.जीलानी ताहीर सय्यद सलाउद्दीन प्रभाग क्रमांक १, बांगी हमीद महंमद प्रभाग क्रमांक १,लाड वैभव चंद्रकांत प्रभाग क्रमांक १, शिंदे वैष्णवी विक्रात प्रभाग क्रमांक ७ याप्रमाणे हे चार उमेदवारि अर्ज मागे घेण्यात आलेत. दापोली नगरपंचायतीची शिवसेनेकडून दळवींकडे निवडणुकीतील सुत्रे गेली व तात्काळ राष्ट्रवादीला नऊ जागा देऊन शिवसेनेने आठ जागांवर समाधान मानले. शिवसेना राष्ट्रवादी आघाडी करताना या सगळ्यात काँग्रेसला दुर ठेवण्यात आले,काँग्रेसने पाच जागांवर आव्हान उभे केले आहे. भाजपने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे तर मनसेने दोन जागांवर आव्हान उभे केले आहे. या सगळ्या प्रस्थापित राजकिय पक्षांसमोर अपक्ष उमेदवारानी मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेकडून आठ जागांवर उमेदवार उभे आहेत. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी कितपत प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात हे महत्वाचे ठरणार आहे.