दापोलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, एकाला अटक


दापोली : तालुक्यातील भौंजाळी (bhaunjali) गावात चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली (dapoli) पोलीसांनी अटक करून न्यायालयात (court) हजर केले असता त्याला २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दापोली शहरानजीक असणाऱ्या भौंजाळी गावात संशयित आरोपी सुरेश नारायण कुंबेटे याच्या अंगणात शेजारील चार वर्षीय चिमुरडी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास खेळायला आली होती. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले.

अत्याचारीत चिमुरडीने आपल्या पालकांना ही घटना सांगितल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात संशयित सुरेश कुंबेटे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी आरोपीवर पोक्सो (pocso) अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. कोर्टानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*