दापोली : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबद्दलची माहिती विचारण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर यांना संपर्क केला असता, आघाडीबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडी होणार की नाही होणार याबाबत त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाहीये. पण वरिष्ठांचा निर्णय शिरसावंद्य राहिल, असं मात्र जयवंत जालगावकर आवर्जून म्हणाले.

या नवीन माहितीमुळे दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमधील वातावरणच ढवळून निघालं आहे.

या आघाडीच्या माहितीबाबत कुणीही अधिकृतपणे नकार देत नाहीये. यावरूनच या चर्चेमध्ये तथ्य असल्याचं बोलले जात आहे. येत्या काही तासांमध्ये याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.