राज्यातील ओमीक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू

मुंबई:- देशात करोना विषाणूच्या ओमीक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या करोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमीक्रॉनच्या चार रुग्णांचे शुक्रवारी निदान झाले. त्यांत एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

राज्यातील ओमीक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*