पुणे १५ मार्च: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.
राज्यभरातील २१ हजार ३८४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर, ७ लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे.