रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे.
लॉकडाउन करायचाच असेल तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ते संध्याकाळी करावा आणि शुक्रवार संध्याकाळी ५ ते सोमवार सकाळी कडक लॉकडाऊन करावा. अन्न, वस्त्र निवारा या माणसाच्या अत्यावश्यक गरजा आहेत. मग केवळ काही दुकान बंद करून कोरोना जाणार आहे का? व्यापारी बांधवांना सुद्धा त्यांचे हप्ते भरावे लागतातच, लाईट बिल भरावं लागतं, सर्व टॅक्सक्स भरावे लागतातच. जर व्यापार बंद असेल तर छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांनी आणि त्यावर निर्भर असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणजेच ज्यांचे रोजचे हातावर पोट चालते त्यांनी पोट कसे भरायचे ते आपणच सांगा, असा सवाल व्यापारी महासंघानं निवेदना द्वारे विचारला आहे.
हणुणच रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि व्यापारी बांधवांसाठी जो पर्यंत आपण हा जाचक लॉकडाउन मागे घेत नाही तोपर्यंत प्राण गेले तरी चालतील पण आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय मी घेतला आहे, असं बंटी वणजू यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन शिथिल करून तो सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ते संध्याकाळी ५ करावा आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ ते सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन करावा व सर्वसामान्य माणसांसह संपूर्ण व्यापारी वर्गालाही दिलासा द्यालाही विनंती ही त्यांनी केली आहे.