प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक

रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या व्यावसायातून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य जनतेला मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या कामाचे सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी कौतूक केले आहे.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये तर प्रत्येक कुटुंबाला सौरभ मलुष्टे त्यांच्या घरातील एक सदस्य वाटू लागले आहे. प्रभागातील नागरिकांच्या पाण्याची तहान सौरभ मलुष्टे यांनी भागविली आहे. त्यांच्या या सामाजिक कामाची चर्चा सध्या नाक्यानाक्यावर सुरु आहे.

शीळ धरणातील जॅकवेल अचानक कोसळल्यानंतर आठ दिवस पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. एमआयडीसीकडून येणारे पाणी संपुर्ण शहराला एकाच वेळी देणे पालिकेला शक्य नसल्याने संपूर्ण शहरात पाणी जात नव्हते.

शहरात पाणीटंचाई असल्याने पाणी टँकर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे पाणी विकत घ्यायाचे म्हटले तरी तोही पर्याय रत्नागिरीकरांकडे उपलब्ध नव्हता.

पालिका एकाच वेळी टँकरने संपूर्ण शहराला पाणी पुरवठा देखील करु शकत नव्हती.

अशा सर्व पार्वभूमीवर शहरातील वरचा भाग, म्हणजेच प्रभाग क्र.5 व 6 मधील नागरिकांना एक हक्काचा व्यक्ती मिळाला तो म्हणजे सौरभ मलुष्टे.

सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून अंगात असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर सर्वप्रथम व्यवसायात लक्ष घालून तो यशस्वी करुन त्यातून मिळणाऱ्या नफ्यातील काही वाटा सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी कायम देणारे सौरभ मलुष्टे याचे सामाजिक काम पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना चांगलेच फायद्याचे ठरले.

गेल्यावर्षी देखील मे व जुने महिन्यामध्ये पाणीटंचाई असताना सौरभ मलुष्टे यांनी पूर्ण 2 महिने टँकरने प्रभाग 5 व 6 मध्ये मोफत पाणीपुरवठा केला होता. त्याच बरोबर गेल्या वर्षी वडिलांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या पाणपोईच्या माध्यमातून अनेक नागरिकांची तहान देखील भागवली आहे.

पाणीटंचाई सुरु झाल्यापासून उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी देखील तात्काळ सौरभ मलुष्टे यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे शहरातील वरच्या भागात प्रभाग क्र.5 व 6 मध्ये यथाशक्ती मोफत पाणीपुरवठा सुरु केला.

त्यानंतर नागरिकांचे फोन सौरभ मलुष्टे यांच्या मोबाईलवर वाजू लागले. पैसे देऊनही टँकर मिळत नाही.अशा वेळी आपल्याला हक्काची व्यक्ती मोफत पाणी देतोय तोही गरजेच्यावेळी हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच भावले.

या दोन्ही प्रभागात उच्चविद्याविभूषित लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनाही सौरभ मलुष्टे यांचे सामाजिक काम चांगलेच भावले. त्यामध्ये वकिल, अधिकारी, इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर, नोकरदार, व्यापारी, महिला वर्ग यांच्यासह सर्वसामान्य जनताही आज सौरभ मलुष्टे यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक करीत आहते.