संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकाल

दापोली : “ज्ञानदीप” दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीने इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत शाळेतील ५७ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

यंदाच्या निकालात आयुषी अमोल उपलप हिने ९९.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, पूर्णश्री विनायक सामल हिने ९५.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर आयुष नितिन वागळे आणि सौम्या जगदीश शिर्के यांनी प्रत्येकी ९४.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे, ४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने सातत्याने उज्ज्वल यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा सरोज मेहता, चिटणीस सुजय मेहता, संचालक सुयोग मेहता, स्कूल कमिटी चेअरमन संकेत मेहता आणि मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या परंपरेचे कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*