रत्नागिरी: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने जिल्हा कार्यालयात दि.12 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
      समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी संत रोहिदास महाराजांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी डी. डी.  केळकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती मोरे, सुप्रिया पवार, जात पडताळणी विभाग तसेच महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.