दापोली : भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली तालुक्याची जबाबदारी आपले विश्वासू संजय सावंत यांच्यावर सोपवली आहे. भारतीय जनता पार्टी दापोली तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय सावंत यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संजय सावंत गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. नगरसेवक म्हणूनही त्यांनी दापोलीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्भूमीवर संजय सावंत यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा आभरी आहे. दापोली तालुक्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट कशी होईल, याकडे मी विशेष लक्ष देईन. जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी सोपवली आहे, ती मी समर्थपणे पार पाडीन. येत्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी सरस राहील अशी ग्वाही, मी या निमित्ताने देत आहे.
– संजय सावंत, नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष