संदिप देसाई यांनी पिशवीत सापडलेले दीड लाख रुपये केले दापोली पोलिसांच्या स्वाधिन

दापोली: आजही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे दापोली मध्ये समोर आले असून सुमारे १ लाख ६० हजार रुपये असलेली पिशवी संदीप देसाई रा.तासगाव यांनी आज शनिवार रोजी दापोली पोलीस ठाण्यात जमा केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप देसाई हे आपल्या चार चाकी गाडीने दापोली पोलीस ठाण्यात असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी तासगाव येथून येत असताना खेड भोस्ते घाटात त्यांना आज दुपारी १.३० वा च्या सुमारास एक पिशवी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली पिशवीत काय आहे हे पाहील्यावर त्यांना आत १लाख ६०हजार आढळून आले तसेच आत मध्ये श्रेया एन्टरप्रयजेस कंपनी, लोटे खेड व मोबाईल नं. आढळून आला होता त्या नंबर वर फोन करून देसाई यांनी आपल्याला तुमचे पैसे मिळाले असून मी ते दापोली पोलीस ठाण्यात जमा करीत आहे असे सांगितले. त्यानुसार श्रेया एंटरप्राइजेस चे विनोद चाळके हे दापोली पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी पिशवी ओळखली व रक्कम कामगारांना वेतन म्हणून देण्यासाठी त्याचा एक कामगार लोटे येथून भरणे येथे दुचाकीवरून जात असताना भोस्ते घाटात पडली असावी असे सांगत त्यांनी मनापासून संदीप देसाई यांचे आभार मानले आणि दहा हजार रूपये बक्षिस संदीप देसाई यांनी दिले. मात्र देसाई यांनी सदर बक्षिसाची रक्कम दापोली पोलीस स्थानकाकडे सुपूर्द केली. दापोली चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी राठोड आणि रत्नागिरी पोलीस अधीक्षक डाॅ.रोहीतकुमार गर्ग  यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*