समृध्दी महामार्ग दोन महिन्यांत खुला होणार

मुंबई – मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून येत्या दोन महिन्यात यातील शिर्डी ते नागपूर हा महामार्ग सुरु होईल.

समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. मुंबईतील भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरमधील मिहान एअरपोर्ट यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करून आवश्‍यक माल संपूर्ण भारतात वेळेवर पोहोचवणे या मार्गाद्वारे शक्‍य होणार आहे. तो पुढील दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल.

राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणत आहे. सध्याच्या काळात पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्हा या महामार्गाच्या बाजूला ग्रीन झोन उभा करत आहोत. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकदेखील सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*