रत्नागिरी – सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठराविक मर्यादा न ठेवता आपल्या सारख्या संस्था जेव्हा काम करतांना समोरच्या व्यक्तीची जात,पात धर्म हे न विचारता ज्या सहकार्यतेच्या भावनेतून काम करीत आहात ते उल्लेखनीय आहे, भविष्यात असेच काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होईल असा विश्वास रिलीफ फाउंडेशन खेड चे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती सिकंदर जसनाईक यांनी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान कार्यक्रमात केला.
22 जुलै रोजी चिपळूण येथे आलेल्या महापुरात ज्यांनी मदत केली अशा संस्थांचा सन्मान चिपळूण येथील हॉटेल रिम्ज येथे करण्यात आला. यावेळी रत्नागिरी च्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेला ही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी संपर्क युनिक फाउंडेशन या संस्थेच्या कामाचे कौतुक करुन या संस्थेच्या प्रगती साठी शुभेच्छा दिल्या.
हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे यांनी स्वीकारला. हा सन्मान आमच्या सर्व सभासदांचा असून याही पुढे आम्ही असेच काम करत राहू,असे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.