दापोली सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी सौ. शर्वरी मेहता (पपी) यांचे दापोली येथे राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मेहता कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

सौ. शर्वरी मेहता या अतिशय प्रेमळ आणि खंबीर होत्या. त्या कायम सर्वांशी मिळून मिसळून राहत. त्यांचं सर्वांशी वागणं अतीशय विनम्र होतं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर दापोली आणि परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माय कोकण’चे संपादक मुश्ताक खान यांनीही शोक व्यक्त केला आहे.

त्यांची अंत्ययात्रा सकाळी 11.30 वाजता दापोली येथील राहत्या घरापासून निघेल, अशी माहिती मेहता कुटुंबियांनी दिली आहे.