दापोली : पिढ्या घडवणारे जालगाव येथील आदर्श शिक्षक माधव तुळजाराम तलाठी उर्फ एम टी तलाठी यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.
दापोली शहरातील ए.जी हायस्कूलचे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही त्यांनी शिकवलं आहे. तीन तीन पिढ्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत राहिले. दापोलीतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.