माजी प्रचार्य सुभाष देव कालवश!

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष देव यांचं गोवा येथे निधन झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुभाष आत्माराम देव यांचा दबदबा होता. शिक्षण क्षेत्रातली एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्यानं रत्नागिरी आणि महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष देव यांनी मुंबई विद्यापीठामधील परीक्षा विभागात देखील काम केलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये पेपर फुटीचे प्रकरण गाजत असताना तत्कालीन कुलगुरू यांनी त्यांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी परीक्षा विभाग संचालक आणि समन्वयक पदी नियुक्ती केलं होतं.

सुभाष देव यांचा अंत्यविधी उद्या सकाळी रत्नागिरीत होणार असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. शैक्षणिक, सामाजिक राजकीय आदी क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*