खेड – खेड नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका आणि उपनगराध्यक्षा वासंती चंद्रकांत महाडिक यांचे निधन झाले आहे. त्या मृत्युसमयी ७४ वर्षे वयाच्या होत्या.
माजी मंत्री रामदास कदम यांच्या त्या सख्ख्या चूलत भगिनी होत्या. सन १९९१ ते २००६ या काळात खेड नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी नगरसेविका पदाचे काम केले.
दरम्यानच्या काळात उपनगराध्यक्षा म्हणूनही त्यांना बढती मिळाली होती. सतत हसतमुख चेहरा असणाऱ्या ‘ताई’ म्हणून त्या शहरात व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात परिचित होत्या.
सुरुवातीच्या काळातील आक्रमक शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शिवसेना महिला संघटनेच्या वतीने मोर्चा आणि आंदोलनात ताईंचा पुढाकार नेहमी असे. शहरातील विविध विकास कामांसाठी त्या आग्रही होत्या.
स्वर्गीय मिनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या वेळी नामकरण वादात पुढे असलेल्या शिवसैनिक होत्या.
त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ही माहिती मिळताच आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि इतर शिवसेना आजी माजी पदाधिकारी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
त्यांच्यावर जगबुडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Advt.