दापोलीचे माजी नगरसेवक काशिनाथ वेल्हाळ यांचं निधन

दापोली : दापोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक काशिनाथ अनंत वेल्हाळ यांचं आज (दिनांक २६ फेब्रुवारी, २०२५) सायंकाळी ७:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते दापोलीतील नटराज नाका येथे वास्तव्यास होते.

वेल्हाळ यांनी दापोली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून अनेक वर्षे लोकप्रतिनिधित्व केले होते.

आपल्या कार्यकाळात त्यांनी दापोली शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले होते.

अलीकडच्या काळात राजकारणातून निवृत्त झालेले काशिनाथ वेल्हाळ यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेल्हाळ यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

वेल्हाळ यांची अंत्ययात्रा उद्या (दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५) सकाळी ८:३० वाजता त्यांच्या नटराज नाका येथील निवासस्थानाहून निघणार आहे.

विविध क्षेत्रातील  मान्यवर मंडळींनी काशिनाथ वेल्हाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*