मनसे विभाग अध्यक्ष ऋषिकेश हेदुकर भाजपामध्ये दाखल

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश सुहास हेदुकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला प्रेरित होऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत.

युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, भटके-विमुक्त प्रदेश आघाडीचे कोकण विभाग संयोजक भाऊ इदाते, तालुकाध्यक्ष मकरंद म्‍हादलेकर, शहराध्यक्ष संदीप केळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वरूप महाजन, नितीन शिंदे, धनु गोरे, भाजपा कार्यकर्ते बलवंत फाटक, मन्या गावडे अविनाश बाळ यांच्या उपस्थितीत ऋषिकेश हेदुकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*