राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन खरात’ याला बलात्कार आणि महिलांच्या शोषणाप्रकरणी अटक झाल्यानंतर हे राजकीय वादळ निर्माण झाले. या प्रकरणाचे धागेदोरे राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुपाली चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले. महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना अशा गंभीर आरोपांमुळे पदाची प्रतिमा मलीन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

अशोक खरातशी संबंध

अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे व्हिडिओ बनवल्याचे गंभीर आरोप आहेत. रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

दबाव आणि आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली होती. चाकणकर यांनी खरातला पाठीशी घातल्याचा आणि त्याला पाठबळ दिल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला आहे.

राजीनामा सुपूर्द

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला.

तपास चक्र

या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT (विशेष तपास पथक) स्थापन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*