दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या रुद्र मंगेश जाधव याने आपल्या उल्लेखनीय भाषण कौशल्याने ‘प्लास्टिक बंदी : काळाची गरज’ या विषयासाठी प्रथम क्रमांक पटकावून शाळेची ओळख आणि अभिमान वाढवला आहे.

तालुक्यातील मुरूड येथील एन. के.वराडकर हायस्कूल तर्फे आयोजित कै. अण्णासाहेब वराडकर स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रूद्रनं बाजी मारली आहे.

रूद्र जाधव हा अतिशय हरहुन्नरी विद्यार्थी आहे. अभ्यासाबरोबरच तो वक्ततृत्व स्पर्धा, अभिनय, कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतो. तालुका मिळवलेल्या यशा बद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशासाठी संतोषभाई मेहता फाउंडेशनचे अध्यक्ष सुजय मेहता, सचिव सुयोग मेहता, विश्वस्त संकेत मेहता, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रितू मेहता व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन व कौतुक केलं आहे.