दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेष्टनात, आत हिरव्या रंगाच्या वेष्टनात तपकिरी रंगाचा आणि वास असलेला ९९८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला.

हा अमली पदार्थ लाल रंगाच्या वेष्टनावर “6 गोल्ड” असा इंग्रजी मजकूर आणि कोरियन भाषेतील काही मजकूर लिहिलेल्या पांढऱ्या कापडी पिशवीत गुंडाळलेला होता.

दापोली पोलिसांनी ही कारवाई करत सदर अमली पदार्थ आरोपीच्या घरातून जप्त केला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पी.एस.आय. यादव, पी.एस.आय. पाटील, स.पो.फौ. गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहिते, पोलीस हेडकॉन्स्टेबल ढोले, पोलीस कॉन्स्टेबल भांडे, पोलीस कॉन्स्टेबल टेमकर, पोलीस कॉन्स्टेबल दिंडे, एल.पी.सी. पाटेकर, कॉन्स्टेबल देवकुले, कॉन्स्टेबल कर्देकर यांनी केला.