आ. रोहित पवार यांचा दापोलीत शिवसेनेतर्फे सत्कार

दापोली, ११ मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आम. रोहित पवार यांच्या दापोली दौऱ्यादरम्यान दापोली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

ही भेट दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्ड फिल्ड संकुलात झाली.

यावेळी दापोली तालुका शिवसेनेतर्फे आम. रोहित पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हा सत्कार दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, बिपिन मोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारीही यावेळी हजर होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*