रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करुन चेहऱ्यावर मास्कचा वापर न केल्याचे दिसून आल्यास अशा व्यक्तींकडून ५०० रुपये दंड आकारण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला होता.
त्याऐवजी मास्क वापर न केल्याचे दिसून आल्यास अशा व्यक्तींकडून 300 रुपये दंड आकारला जाईल असा सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त 26 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशातील सर्व बाबी कायम व बंधनकारक राहतील असे आदेशात म्हटले आहे.