रत्नागिरी : राज्याचे गृहे (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालीलप्रमाणे आहे.

शनिवार, २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता जामगे, ता. खेड येथील निवासस्थानाहून मोटारीने (एम एच ०२ जी एम ०००९ डीफेंडर) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण करतील. दुपारी ११:३० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन होईल. दुपारी १२ वाजता ते शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीस उपस्थित राहतील (स्थळ: विवेक हॉटेल, रत्नागिरी). सायंकाळी ४:३० वाजता विवेक हॉटेल, रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४:५० वाजता रेल्वेस्थानक, रत्नागिरी येथे आगमन होईल. सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी येथून वंदे भारत एक्सप्रेसने ते ठाणे जिल्ह्याकडे रवाना होतील.