
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.
त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८ महिने इतका प्रदीर्घ काळ अत्यंत निष्ठा आणि प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात जीवन सावंत, प्रवीण सुर्वे, लतिका गावडे, अक्षया मयेकर, एस. कपाळे, शितल चव्हाण आणि इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला.
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी आपल्या मनोगतात चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.
त्यांनी चव्हाण यांनी आपल्या सेवाकाळात दाखवलेली प्रामाणिकता आणि कर्तव्यदक्षता ही इतरांसाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले.
यावेळी चव्हाण यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुख-समृद्धी लाभो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना चव्हाण यांनी आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला आणि सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या समारंभास विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply