मुंबई:- राज्यात भिवंडीनंतर, पुणे, पिंपरी चिंचवड येथे ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णसंख्या आठ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीतही रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या दोन्ही लाटांतून राज्य हळूहळू बाहेर पडू लागले असले तरी आर्थिक स्थिती अजूनही बिकटच आहे.