गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

मंत्रालय येथे गुरुवार दुपारी 04.00 वा. प्रधान सचिव (नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत असणार आहे.

सधिस्थितीत कोवीड-१९ च्या संक्रमणामुळे विहीत केलेले आयोग्य विषयक निकष विचारात घेता, सदर सोडतीसाठी संबंधित अधिकारी/ लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहण्यचे आदेश देण्यात आले आहे

सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात दुरदृष्यप्रणाली (व्हिडीओ कॉन्फरनस V.C.) ची व्यवस्था करावी. त्याचबरोबर सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १० लोकप्रतिनिधीना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित यंत्रणेला कळवण्याचे आदेश नगरविकास खात्यानं दिले आहेत.

दापोली नगरपंचायतीत कोणाचं नशीब चमकणार हे येत्या तीन दिवसात स्पष्ट होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*