शिवजयंती विशेष: क्षितिज कलामंचाचा अभिनव उपक्रम, 300 विद्यार्थ्यांनी वाचली शिवचरित्रावरील पुस्तके!

दापोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने क्षितिज कलामंचाने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.

टाळसुरे, मुरूड आणि चंद्रनगर येथील तीन शाळांमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावरील पुस्तकांचे वाचन करून शिवजयंती साजरी केली.

या उपक्रमात न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे, न.का. वराडकर शाळा मुरूड आणि जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर या शाळांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि वाचनाची गोडी लागावी, यासाठी तिर्था स्कंधा स्वप्निल खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि भेटवस्तू दिल्या.

क्षितिज कला मंचाचे अध्यक्ष अभिजित भोंगले, महेंद्र बांद्रे आणि वैभव सागवेकर यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

क्षितिज कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुनील कदम यांची ही संकल्पना होती.

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरेचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली.

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरेचे विद्यार्थी

न.का. वराडकर मुरूड हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद गमरे, राजू नरवणकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

न.का. वराडकर मुरूड हायस्कूलचे विद्यार्थी

चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडिगावकर, मानसा सावंत, रेखा ढमके यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले.

चंद्रनगर जि. प. शाळेचे विद्यार्थी

या उपक्रमाबाबत क्षितिज कला मंचाचे अध्यक्ष अभिजित भोंगले म्हणाले,

“शिवजयंती साजरी करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांची ओळख करून देणे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि शिवचरित्रावरील पुस्तके वाचली, याचा आम्हाला आनंद आहे.”

अभिजीत भोंगले, अध्यक्ष क्षितिज कलामंच

न.का. वराडकर मुरूड हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद गमरे सर म्हणाले, “क्षितिज कला मंचाने आयोजित केलेला हा उपक्रम खूप चांगला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांची माहिती मिळाली आणि त्यांची वाचनाची आवडही वाढली. अशा प्रकारचे उपक्रम शाळेत नियमितपणे आयोजित केले पाहिजेत.”

जिल्हा परिषद शाळा चंद्रनगरचे मुख्याध्यापक मनोज वेदक म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खूप फायदेशीर ठरला. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. क्षितिज कला मंचाचे आम्ही आभारी आहोत.”

क्षितिज कलामंचाने आयोजित केलेला हा उपक्रम यशस्वी झाला आणि विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*