येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD

मुंबई सह कोकणाला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देणय्ता आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे. तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांसाठी १९ जुलै साठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर २० जुलैपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचा रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी ?

येत्या २४ तासांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आङे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच काही भागात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहतील अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई तसेच परिसरासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठीही १८ जुलैचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट कोणत्या कालावधीसाठी ?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर तसेच साताऱ्यांसाठीही १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*