कुडाळ : दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव गावामध्ये दापोलीतील कृषी महाविद्यालयाच्या कृषी सह्याद्री गटामार्फत रावे अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या कृती नुसार खव्याचे मोदक आणि बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक पार पडले.
या प्रात्यक्षिकाद्वारे माणगाव गावातील विकसनशील शेतकऱ्यांना दुग्धजन्य पदार्थ बनविण्यास प्रोत्साहन देऊन डेअरी व्यवसायाकडे लोकांना रुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तसेच कोकणातील शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचे फायदे व शेतपूरक जोड-व्यवसाय कसा करता येईल याबद्दल माहिती सांगण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. नरेंद्र प्रसादे, गावच्या सरपंच, डॉ.संदीप गुरव (केंद्रप्रमुख) आणि
डॉ. रणजीत देवहरे (कार्यक्रमाधिकारी) तसेच ग्रामपंचायत माणगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.