
दापोली: ग्रंथालय चळवळीतील प्रदीर्घ कार्याची दखल घेत लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा ‘कै. ॲड. त्र्यंबकदास झंवर काका आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार’ रवींद्र राजाराम कालेकर यांना जाहीर झाला आहे.
६ मार्च २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
रवींद्र कालेकर गेल्या ४१ वर्षांपासून ग्रंथालय चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्षपद तसेच जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील विविध पदांवर काम केले आहे.
ग्रंथालय चळवळीतील त्यांचे योगदान आणि कार्यातील तत्परता लक्षात घेऊन लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
रोख ११,००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २८ मार्च २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि इतर उपस्थितांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
या निवडीबद्दल जिल्हा ग्रंथालय संघ आणि ग्रंथालय चळवळीच्या वतीने कालेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply