रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी कल्याण जिल्हाध्यक्ष के. आर. जाधव आणि वयोवृद्ध मार्गदर्शक बापूसाहेब मोकाशी यांचेही आशीर्वाद घेतले.

रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, “राज्याच्या काना-कोपऱ्यात भाजपाच्या विचारधारेची पाळेमुळे अधिक बळकट करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी मी श्री गणरायाच्या चरणी शुभाशीर्वाद आणि बळ मागितले आहे.” उद्या, १ जुलै २०२५ रोजी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

रविंद्र चव्हाण हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटक म्हणूनही पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीबद्दल पक्षातून समाधान व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*