रत्नागिरीतून तिघांना तडीपार, महिलेचा समावेश

रत्नागिरी – रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) तिघांना तडीपारीचे आदेश दिले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये झाडगाव येथील हेमंत भास्कर पाटील, राजिवडा येथील रिहाना उर्फ रेहाना उर्फ रिजवाना गफार पकाली आणि जयस्तंभ येथील अमेय राजेंद्र मसुरकर यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे अंमली पदार्थ विक्री संदर्भात व इतर असे एकूण ९ प्रकरणे सादर केली होती. यापैकी यापूर्वी तीन जणांना तडीपार करण्यात आले आहे.

सध्या आणखी दोघांविरोधात सुनावणी सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय, संशयित अमिर मुजावर याच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव असून, तो सध्या जिल्हा कारागृहात आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

तडीपार करण्यात आलेल्या तिघांना रत्नागिरीसह लगतच्या पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*