नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे देशाच्या आर्थिक विकासात लवकरच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. आत्मनिर्भर अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या या जिल्ह्यात काजू, आंबे, मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी खास योजना बनविण्यात आली आहे. यासाठी माजी उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे प्रयत्न करत आहेत. आंब्याची शेती, मासेमारी, पर्यटन आदी उद्योगांच्या विकासासाठी आणि निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन मंथन केले. यात जिल्ह्याचे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि योजनेशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. आयआयएम लखनौ आणि नॅशनल काउंन्सिल ऑफ एम्प्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांच्याकडून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या वार्षिक उत्पादनात वाढ होईल. यामुळे जीडीपीतही वाढ होईल.