रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: महायुती जागावाटप ठरले – भाजपला  ६ जागा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. या बैठकीमध्ये राजापूरचे आमदार भैय्या सामंत, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, रत्नागिरी जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, शहर संयोजक सचिन वहाळकर, मामा मयेकर, महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपला अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे फक्त ६ जागा मिळाल्या. या जागांवर खालील उमेदवार मैदानात उतरणार आहेत:

  • प्रभाग १ : नितीन जाधव
  • प्रभाग १० : राजू तोडकर
  • प्रभाग १० : मानसी करमरकर
  • प्रभाग ११ : समीर तिवरेकर
  • प्रभाग ११ : सुप्रिया रसाळ
  • प्रभाग १५ : वर्षा ढेकणे

मोठा ट्विस्ट: सुशांत (मुन्ना) चवंडे शिवसेनेकडून रिंगणात?

जागावाटपातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो प्रभाग १५ भाजपच्या अंतर्गत यादीत स्थान न मिळालेला सुशांत चवंडे आता थेट शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. हा बदल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीतील हे जागावाटप आणि उमेदवार निश्चिती येत्या काही दिवसांत अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*