राणी खेत्रे सुखरुप, दापोली पोलिसांचे यश.

दापोली:- राणी राजू खेत्रे. ही तेरा वर्षाची मुलगी दिनांक २२ फेब्रुवारी दुपार पासून तिचे मूळ गाव नानटे बौद्धवाडी. ता.दापोली जि.रत्नागिरी येथून हरवली होती. तशी तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे राणीच्या आजीने दाखल केली होती.
दरम्यान या प्रकरणाचा तपास महिला पोलीस हेडकाँन्स्टेबल साक्षी गुजर या करित होत्या.
आज संध्याकाळी राणीला घेऊन साक्षी गुजर दापोली पोलीस स्थानक येथे दाखल झाल्यावर पोलीसांसह दापोली तालुक्यातील समुपदेशकांनी आणि जाणकारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. राणीला सहीसलामत दापोलीत परत आणल्याबद्दल महिला पोलीस हेडकाँन्स्टेबल साक्षी गुजर आणि सहकार्यांचे दापोली पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.दापोली तालुक्यातून दापोली पोलीसांचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*